सराईत गन्हेगाराची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – अपहरणाच्या गुन्हात फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रोनक विलास भोसले (२४, रा.पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनक याच्यावर शहरातील विविध ११ ते १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाच्या पर्यटनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार होता असे असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान रोनक याला आई वडील नसून तो मामाकडे राहत होता. त्याने शनिवारी सायंकाळी पीएमसी कॉलनीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यानंतर ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याचे मृत्यू झाल्याचा अहवाल ससून रुग्णालयाने दिला आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

Visit : Policenama.com