अबब ! पुण्याच्या वाहतूक पोलिसांकडून तब्बल 27 लाख केसेस, 111 कोटी 74 लाखाचा दंड, इथं वाचा यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाने स्मार्ट वर्क करत पुणेकरांवर एका वर्षात तब्बल 111 कोटी 78 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आकडा पाहून पोलीस दलातही मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहेच पण पुणेकरांची झोप मात्र यामुळे उडाली असून, आता यापुढे तरी आपण या दंडातून सुटू यासाठी वाहन चालवणे तरी बंद करावे लागणार आहे किंवा मग हेल्मेट घालून वाहतूक नियम पाळावे लागणार आहेत. हा दंड गोळा करण्यासाठी पोलीसांनी तबल 27 लाख केसेस केल्या आहेत. सर्वाधिक दंड हा हेल्मेट परिधान न केल्याचा आहे.

शहरातील वाहतूक डबघाईला आली आहे. पुणेकर इच्छित स्थळी जाण्यासाठी दररोज कासव गतीने प्रवास करतात. त्यात कधी अडकले तर तासंतास ताटकळत बसावे लागते. वाहतूक पोलीस आणि महापालिका पुणेकरांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला वाहतूक कोंडीतून बाहेर काढू असे आश्वासन दिले जाते. पण वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. कधी सिग्नल व्यवस्था बंद पडते. तर कधी अपुऱ्या रस्त्यांमूळे रांगा लागतात. मग तिथे वाहतूक पोलीस असो वा नसो पुणेकर त्यातून वाट काढत असतो. त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे तर आणखीनच भर पडत आहे. अनेक निष्पाप नागरिकांचा जीव टांगणीला लागतो.

पुण्याला शिस्त प्रिय पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम मिळाले आणि त्यांनी पुण्याच्या वाहतूकीवर जालीम उपाय शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रथम पुणेकरांना हेल्मेट सक्ती केली. वाहतूक पोलीसांना कारवाईचे फरमान सोडले. मग काय घोळक्याने आणि तिसऱ्या डोळ्यातून कोणताच पुणेकर सुटला नाही. आणि शहरात फक्त हेल्मेट दहशतच सुरू झाली.

जीवघेण्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांना ठोठावला दंड
केवळ हेल्मेटच्या कारवाईतुनच 82 कोटींहून अधिक दंड पुणेकरांना करण्यात आला आहे. त्यातला 60 कोटींहून अधिक दंड वसूल करायचा आहे. तो कसा वसूल करायचा याचं कोडं अजून तरी सुटलेले नाही. आता पोलीस जास्त दंड असला की गाडीच ठेऊन घेऊ लागले आहेत. त्यामुळे वादही होत आहेत. मात्र तो दंड काही वसूल होत नसल्याचे सांगितले जाते. त्यावरून वरिष्ठ अधिकारी आणि संबधिताची झाडाझडती घेतली जात आहे.

पण, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाट काढणारऱ्या पुणेकरांना दंडही भराव लागत आहे. त्यातून सुटका कोण करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राजकारणही काहीवेळा तापते. पण नंतर पूढे जैसे थेच असते.

नोंदवलेल्या केसेस

1. नो-पार्किंग 3 लाख 23 हजार 74,
2. नो-एन्ट्री- 35 हजार 106,
3. विना लायसन्स – 20 हजार 719,
4. रॅश ड्रायव्हिंग – 12 हजार 26,
5. मोबाईल टॉकींग – 19 हजार 299,
6. ट्रिपलसीट – 16 हजार 800,
7. झेब्रा क्रॉसींग – 59 हजार 931,
8.लायसन्स जवळ न बाळगणे -1 लाख 19 हजार 789,
9. विनाहेल्मेट -17 लाख 5 हजार 915,
10.रॉंग साईड ड्रायव्हिंग – 47 हजार 932,
11. इतर – 3 लाख 98 हजार 708,
एकुण केसेस – 27 लाख 59 हजार 229.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/