सराईत गुन्हेगाराला पुणे शहरातून 2 वर्षासाठी तडीपार ; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सराईत गुन्हेगार महादेव सर्जेराव मोरे (वय ३५, राहणार, सिद्धार्थ नगर, कोंढवा खुर्द, पुणे) पुणे शहरातून २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आले.

पुणे शहरामध्ये असलेला शरीराविरोध्द व मालाविरुद्ध गुन्हे दाखल असलेले सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व निवडणुकीच्या निकाल कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व माजी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ ५ अंतर्गत असणारे हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड, बिबवेवाडी पोलिस ठाणे हद्दीत पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच प्रकाश गायकवाड यांनी अद्यापर्यंत रेकॉर्डवरील शराईत एकूण १४ गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

मंगळवार दि. २१ मे २०१९ रोजी कोंढवा पोलीस ठाण्यामधील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार महादेव सर्जेराव मोरे (वय ३५,राहणार, सिद्धार्थ नगर, कोंढवा खुर्द, पुणे) याच्या विरोधात वानवडी मध्ये १, बंडगार्डन मध्ये १, कोंढवा मध्ये ५ असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास तडीपार आदेश क्रमांक १४/२०१९ अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

सदर हद्दपारीची प्रतिबंधक कारवाई माजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे व माजी अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिमंडळ ५ यांनी केली आहे.