हेल्मेट सक्तीवरून पुण्यातील ६ आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, पण पोलिस म्हणतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे वाहातूक शाखेकडून कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. पुणे शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली असून याला पुणेकरांचा विरोध आहे. रस्त्यावर टोळक्याने उभे राहून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येत आहे. पुणेकरांना हेल्मेट सक्तीपासून वाचवण्यासाठी पुण्यातील सहा आमदार पुढे सरसावले आहेत. पुण्यातील सहा आमदारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन हेल्मेट सक्ती शिथिल करण्याची मागणी केली. आमदरांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना याबाबत आदेश दिले आहेत.

मागील काही महिन्यांपासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या जवळ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र हेल्मेट सक्ती करण्यात आलेली नाही. पुण्यामध्ये शहर पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकामध्ये हेल्मट कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला पुणेकरांमध्ये तिव्र असंतोष आहे. या संदर्भात अधिवेशनामध्ये पुणेकरांची बाजू मांडावी अशी मागणी पुण्यातील आमदरांकडे करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुण्यात हेल्मट सक्ती कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी आमदरांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवत पुण्यातील हेल्मट सक्तीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता हेल्मेट कारवाईतून मुक्ती मिळणार आहे.

याबाबत माहिती देताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे शहर पोलिसांकडून हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येत होती तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत होता. यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी होती. आज पुण्यातील सर्व आमदरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नला वाचा फोडली. या भेटीदरम्यान पोलिसांकडून वाहन चालकांचा परवाना ताब्यात घेणे, पोलिसांकडून वाहन चालकांवर होणारी आरेरावी याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर पुणेकरांची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू ऐकून घेत हेल्मेट सक्तीला स्थगिती देण्याचे आदेश पुणे पोलीसआयुक्तांना दिले आहेत.

पोलीसांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी अद्याप तरी काही कल्पना नसल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’