पुणे – मुंबई मार्गावरील ‘डेक्कन क्वीन’सह ‘या’ 4 एक्सप्रेस ट्रेन ‘रद्द’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरील 4 एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्या आहेत. आज म्हणजे 6 ऑगस्ट रोजी धावणाऱ्या या ट्रेन रद्द झाल्या आहेत. यामध्ये डेक्कन क्वीन एक्सप्रेस(12124), इंटरसिटी एक्सप्रेस(12127), सिंहगड एक्सप्रेस(11010), इंद्रायणी एक्सप्रेस(22106) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

डेक्कन क्वीन एक्सप्रेस पुण्याहून सकाळी 7 वाजून 15 मिनीटांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करते. मुंबईला 10:30 ला पोहचते. ही गाडी रद्द करण्यात आली आहे. इंटरसिटी एक्सप्रेस सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी मुंबईहुन पुण्याला निघते. पुण्याला 9 :30 ला पोहचते. इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सिंहगड एक्सप्रेस सकाळी 6 वाजून पाच मिनिटांनी पुण्याहून मुंबईला निघते. सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

सकाळी जाणाऱ्या ट्रेन रद्द केल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फटका नोकरदार वर्गाला बसणार आहे. पुणे मुंबई असा प्रवास प्रवास नोकरदार वर्ग करतो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रवाशांकडुन घेण्यात आला आहे.

जोरदार पावसामुळे दरडी कोसळत आहे म्हणून या ट्रेन रद्द करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like