कंट्रोल रूममध्ये फोन करुन महिला पोलीस कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात फोन करुन एकाने महिला कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडे तिनच्या सुमारास घडला.

या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. तर शिवाजी शहाजी समिंदर (३२, रा. औंध) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात पीडित महिला काम करत होत्या. त्यावेळी शिवाजी याने नियंत्रण कक्षात फोन केला. पोलीस काही कामाचे नाहीत, पोलीस खाते बंद करा असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली.

तसेच तू भेट तुला बघून घेतो अशी धमकी दिली. पीडित महिला कर्मचाऱ्याने याबाबत चिचंवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिवाजीला अटक केली. तपास पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त – 

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा

वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

 

Loading...
You might also like