पुणे पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील तक्रारदारांना १ कोटी ७७ लाखांचा ऐवज ‘प्रदान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील विविध गुन्ह्यात चोरट्यांकडुन जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुणे पोलिसांकडून तक्रारदारांना पुन्हा प्रदान करण्यात आला. ६१ गुन्ह्यातील तब्बल ८२ लाख आणि सायबर पोलिसांनी ३४ लाख असा ऐकून १ कोटी ७७ लाख रुपयांचा ऐवज परत देण्यात आला आहे. यावेळी चोरीस गेलेला किंमती ऐवज पुन्हा मिळत असल्याने तक्रारदार यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते मुद्देमालाचे वाटप करण्यात आले. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Pune Police
यावेळी अनेक तक्रारदारानी पोलिसांसोबत आलेल्या चांगला अनुभव सांगितला. पोलिस आयुक्तांनी मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी काम पाहिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविले. झोन पाचमधील सर्वाधिक १७ गुन्ह्यांमधील ४१ लाखांचा आज तक्रारदारांना मुद्देमाल देण्यात आला आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयाकडून तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षात तीन वेळा कार्यक्रम घेण्यात आला आहे. यात ३ कोटी ४१ लाख रूपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात ६९ गुन्ह्यांमधील एक कोटी १८ लाख रुपायंचा मुद्देमाल परत करण्यात आला होता. तर, सप्टेंबर महिन्यात ९१ गुन्ह्यांमधील एक कोटी पाच लाख मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com