पुणे पोलिसांचे परिमंडळ-5 ‘स्मार्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलात आणखी एक मानाचा तुरा लागला असून, पुणे आयुक्तालयाअंतर्गत 2018 मध्ये सुरू केलेल्या परिमंडळ पाचने स्मार्ट अन आयएसओ 9001,2015 मानांकन मिळविले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Pune Police

पुणे पोलीस आयुक्तालयाचे विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. तत्पुर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चार परिमंडळ होते. विभाजन झाल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये पुणे पोलीस दलात पाच परिमंडळ झाले. प्रत्येक परिमंडळात सहा पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला. परिमंडळ पाचमध्ये मुंढवा, हडपसर, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी आणि मार्केटयार्ड पोलीस ठाणे येतात. या परिमंडळचे पहिले पोलीस उपायुक्त म्हणून प्रकाश गायकवाड यांची नेमणूक झाली.

त्यानंतर वर्षाहून अधिक काळ त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळताना पोलीस ठाण्यांना भेटी देताना काही उणिवा जाणवल्या. त्यावेळी त्यांनी अमुलाग्र बदल करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पोलीस ठाणे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग आणि परिमंडळ पाचमधील सुसज्ज करण्यात आले. मध्यंतरीच त्यांची पुणे पोलीस दलातून राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बदली झाली. त्यानंतर परिमंडळ पाचचे उपायुक्तपदी सुहास बावचे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी या प्रयत्नांना पुढे नेत हा प्रयत्न पुर्णत्वास नेला.

त्यात प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा टापटीप व एकसारखा पोशाख, पोलीस स्टेशनची रंगरंगोटी व सुव्यवस्थितपणा, तक्रारदारांसाठी स्वागतकक्ष व चांगली वागणूक, अभिलेखाची वर्षानिहाय मांडणी व निर्लेखन, गुन्हे व मुद्देमाल निर्गती, गुन्ह्याच्या ठिकाणास विनाविलंब भेट व करवाई व अभ्यागतांसाठी फिडबॅक सिस्टीम अशा स्तरावर बदल करण्यात आले. एका खासगी संस्थेने स्मार्ट आणि आयएसओ मानांकनासाठी शहर पोलीस दलात पाच परिमंडळात केलेल्या सर्व्हेत परिमंडळ पाच हे सर्वोत्कृष्ट ठरले. त्याला आयएसओ मानांकन आणि स्मार्ट असा किताब मिळाला आहे.

Pune

तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड तसेच पोलीस उपायुक्त सुहास बावचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील व सुनील देशमुख, तसेच मुंढवा पोलीस स्टेशन – पोलीस निरीक्षक पात्रुडकर व भोसले, अजित लकडे व मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व निंबाळकर, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड व अनिल पाटील, पोलीस निरीक्षक सुनील तांबे व रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक सयाजी गवारे व क्रांतीकुमार पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/