पुण्यात पोलिस देखील असुरक्षित ? पोलिसाचे अपहरण करून बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गुंडगिरी वाढत असून खंडणी, हाणामारी, खून अशा घटना घडत असताना ज्यांवर गुन्हेगारी कमी करण्याची जबाबदारी आहे. तेच पोलीस पुण्यात देखील सुरक्षित नाहीत. पुण्यात पोलिसाचेच अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील हॉटेल निखारा जवळ रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडला.

एका कारला नंबर प्लेट नसल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक सचिन तनपुरे (वय-३५) यांचे गाडीतील तिघांनी अपहरण केले. तसेच तनपुरे यांना शिवीगाळ करून मारहाण करत २५ किलोमिटर दूर परिसरात सोडून दिले. तनपुरे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात सचिन रानवडे, मयुर मते आणि त्यांचा साथीदाराविरुद्ध फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन तनपुरे हे सिंहगड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्य़रत आहेत. रविवारी रात्री तनपुरे आणि त्यांचे सहकारी शिंदे असे दोन्ही बीट मार्शल रात्रगस्तीवर होते. त्यावेळी निखारा हॉटेल समोर पाठीमागे नंबर प्लेट नसलेली कार दिसली. संशय आल्याने तनपुरे चौकशी करण्यासाठी गेले. त्यांनी कारचा दरवाजा उघडला असता कारमध्ये तिघेजण मद्यपान करताना दिसून आले. तनपुरे यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रानवडेने तनपुरे यांना शिवीगाळ केली. तर शिंदे यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तनपुरे यांनी गाडीत बसून गाडी अभिरुची पोलीस चौकीत नेण्यास सांगितले. त्यावेळी कार चालकाने गाडी पोलीस चौकीत न नेता प्रयेजा सिडीकडून मुंबई-बेंगलोर माहामार्गावर कार नेली. गाडीमध्ये तनपुरे यांना शिवीगाळ करत मारहाण करून उड्डाणपुलावरून खाली फेकून देण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे असलेले वॉकीटॉकी आणि मोबाईल काढून घेतला. आरोपी रानवडे याने मारहाणीचा व्हिडीओ काढून तनपुरे यांना बावधन रस्त्यावर सोडून देत पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड करीत आहेत.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या