लोहमार्ग पोलिसांकडून अल्पवयीन मुले पालकांच्या स्वाधीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्थानक भागात पळून आलेल्या तसेच भिक्षा मागून जगत असणारी 9 मुले पोलिसांनी पुन्हा त्यांच्या पालकांना मिळवून दिली आहेत. यात कोल्हापूर, रायगड, कर्नाटक, तळवडे पुणे, मळवली पुणे परिसरातून पळून आलेल्या मुलांचा समावेश आहे.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक दिपक साकोरे यांनी स्थानक परिसरात बंदोबस्त तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव गस्त वाढविली आहे. तर मुस्कान अंतर्गत हरवलेल्या तसेच अपह्रत बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविले जात आहे. दरम्यान लोहमार्ग पोलिस आणि दामिनी पथकाने नऊ मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर अल्पयीन मुलांच्या पालकांचा शोध घेऊन मुलांना स्वाधीन करण्यात आले.

ही कामगिरी लोहमार्ग पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कांचन आल्हाट, निशा ओव्हाळ, साधना वाघमारे, संतोषी ढेंबरे, साथी संस्थेच्या करुणा मेश्राम, अमृता बळगानुरे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा –