RTO एजंटची गुन्हे शाखेकडून झाडाझडती, आरटीओत खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे उपप्रादेशिक परिवहन महामंडळात (आरटीओ) परिसरात एजंटची गुन्हे शाखेकडून बुधवारी सायंकाळी झाडाझडती करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयासह शहरात खळबळ माजली असून, एजंट बोगस कागदपत्राद्वारे वाहन नोंदी आणि लायसन तसेच इतर कामे करून देत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच ही झाडाझडती घेतली जात असून यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरु होती,

आरटीओ कार्यालयात दररोज हजारो वाहनांची नोंदणी होते. तसेच अनेक नागरिक येथे वाहन परवाना घेण्यासाठी येत असतात. यासाठी पुरावा म्हणून काही कागदपत्र द्यावी लागतात. अनेक नागरिक पुण्यात बाहेरील राज्य देश आणि गावावरून आले आहेत. अशा वेळी त्यांना कागदपत्र देण्यासाठी अडचणी येतात. दरम्यान आरटीओत एजंटचा सुळसुळाट आहे. नवीन व्यक्ती कार्यालयात जाताच हे एजंट व्यक्तिजवल घराडा घालून काम करून देण्याची हमी देतात. त्यासाठी आगाऊ पैसेहि घेतले जातात. त्यातही आरटीओचे काम म्हणजे तांसतास ताटकळत उभे रहावे लागते. त्यांमुळे अनेक नागरिक या एजंटचा आधार घेतात. जाडा पैसे देऊन मग एजंट त्यांच्या पद्धतीने कामे करतात.

दरम्यान पुणे पोलीस दलातील अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना आरटीओ एजंट कागद्पत्रामंध्ये गोंधळ करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेला अचानक याठिकाणी छापा मारून झाडाझडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी (पश्चिम) विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी संदीप साबळे,
व त्यांच्या पथकाने याठिकाणी झाडाझती सुरु केली आहे. आरटीओ कार्यालयाजवळील एका इमारतीमधील तीन ते चार एजंटच्या ऑफिसेसवर या पथकांनी झाडाझडती घेतली आहे.

तेथील कागदपत्रे तपासली जात असून त्यात आक्षेपार्ह्य आढळ्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रात्री उशिरापरीयंत या कागदपत्रे तपासली जात होती. त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी आहेत का, याचीहि माहिती घेतली जात आहे. तर, त्यांनी नेमकी कोणाला काय काढून दिले हेही तपासले जात आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली असून येथील कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. याप्रकणी गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितली . गुन्हे शाखेच्या झाडाझडतीमुळे मात्र दहशत बसणार आहे.

Visit : Policenama.com