पर्वती येथील ‘वृक्षतोड’ थांबवण्याची स्वाभिमान संघटनेची मागणी

पुणे : पोलासनामा ऑनलाइन – पर्वती येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात असलेल्या वृक्षांची तोडणी करण्यात येत असून वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि वृक्ष तोड करणाऱ्या संबंधीतांवर कारवाई करावी असे निवदेन स्वाभिमान संघटनेने दिले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांना निवेदन देण्यात आले आहे.

पर्वती येथे दोन पाण्याच्या टाक्या असताना तिसरी टाकी बांधण्याच्या नावाखाली झाडे तोडण्यात येत आहे. या ठिकाणी २० ते २५ वर्ष जुनी असलेली बाबुळ, खैर, कडुलिंब, सिताफळ, वाळवा इत्यादी प्रकारची ७२ झाडे आहेत. या वृक्षांची कत्तल करून नवीन पाण्याची टाकी बांधण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. यापूर्वी स्वाभीमान संघटनेच्यावतीने छत्रपती संभाजी उद्यान येथील महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्य़ालयात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन देऊन वृक्षतोड होणार नसल्याचे सांगितले. मात्र, या ठिकाणी वृक्षतोड सरु असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

एकिकडे सरकार ३३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत असातना दुसरीकडे महानगरपालिका पाण्याची टाकी बांधण्याच्या नावाखाली वृक्षतोड करत आहे. या ठीकाणी दोन पाण्याच्या टाक्या असून जुन्या टाकीतून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. असे असताना देखील पालिकेने तिसरी टाकी बांधण्याचा घाट घालत वृक्षतोड सुरु ठेवली आहे. जुन्या झाडांचं जतन करून त्यांची कत्तल थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून महापालिकेने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे परिसरातील १६ झाडे तोडण्यात आली असून झाड तोडणाऱ्या संबंधीत व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !