पुरंदर मधील शेतकऱ्यांना मिळणार 72 कोटीची ‘कर्जमाफी’, 9662 शेतकरी ठरले ‘पात्र’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ नुसार ७२ कोटी ८५ लाख रुपये प्राप्त होणार असून यामध्ये ९६६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ५२ शेतकऱ्यांच्ये आधार लिंक न झाल्याने त्यांना आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पुरंदर तालुक्‍यातील एकूण ९७ सेवा सहकारी संस्थांना याचा फायदा होणार आहे. तर १ मार्च पर्यत संबंधित शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होईल. असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थाचे प्रमुख महेशकुमार गायकवाड यांनी सांगितले.

संस्थेचे नाव, कंसात शेतकरी संख्या पुढे रक्कम :
सासवड विविध कार्यकारी सोसायटी, सासवड शेतकरी (५२)३१७१०३९, सासवड नं. ३ (१७) ४९८७३४, ताथेवाडी (३१) १४७४२०६, आंबोडी (४२ ) ३५७८६५३, जाधववाडी (२८) १८९३६४९, झेंडेवाडी (2८)१७९३५९२, सुपे खुर्द (१४१) १०३९०४५८, दिवे (५४) ३३४१०५७, हिवरे (२३ ) १९८९४१५, सोनोरी ( १०३) ६३२३०६४, पिंपळे (१०४) ६९८०८८५, वनपुरी (८९) ६२११५५१, कुंभारवळण (२०) ८७८५११, खानवडी (११८) १२५७२१९४, पवारवाडी (२० ) २०९६३७९०, मुंजवडी (४६) ३२७४५१८, बोराळवाडी (१२) ९६३७९०, भिवडी (११३) ८१५७२२८, पुरपोखर (८६) ६७६७४९१, केतकावळे (५३)१४०२३७२, देवडी (४०) १४०२३७२, पिंपरे खुर्द (४९) ४३५६४३१, शिवतक्रार (४७) ३०८८२९८, जेऊर ग्राम (७५) ४१४२२६९, जय मल्हार जेऊर (७४) ४५७४५२१, राख (२२३) १७७३३१९८, गुळूंचे (७३) ६२९५७१८, भैरवनाथ गुळूंचे (५१) ४१६७८९१, पिसुर्टी (४३) ३२८५१२९, कर्नलवाडी (८८) ७२१२७१५, निंबुत ता. बारामती (८) ९९२१०५, फरांदे नगर ता. बारामती (४७) ३३७२५०४ नाझरे क प (२१०) ११९३५७२८, शरद नाझरे क प (३१) २०७३८८०, साकुर्डे (१६३) ११०६८०८७, जवळार्जुन (१४२) ७७८६६९३, कोळविहिरे (१३९) ९५२७२५४, शिरसाई कोळविहिरे (१६६) ११७७७७३५, नवळी (८२) ५२६२६७९, नाझरे सुपे (१११) ९२२७६०६, मावडी कप (२४९) १९२६३२८४, जयाद्री जेजुरी (१९४) १४६५४१३१, कोथळे (१३१) ९५८८८०७, पांडेश्वर (१७१) १२०५८९८३, बोरमलनाथ पांडेश्वर (११५) १०९७१७४८, बेलसर निळुंज (४२२) ३०७०८७५१, शिवशंभो बेलसर (६२) ३४२७६७५, चंद्रानंद कोथळे (३६) २९३१७५५,धालेवाडी (५१) ५१३६०८२८२, भोसलेवाडी कोथळी (६५) ३९९४०२१, वाल्हे (१२५) ७३९७१६३, सुकलवाडी (६५) ४४२२३८६,त्र वागदरवाडी (८४) ८४५४४६१, दौंडज (१५४) ११५५१९०६, हरणी (४६) २८९९३०२, पिंगोरी (६१) ६४१६६६७, परिंचे (१०७) ५९३१५६४, हरगुडे (२२) ११९०१९३, पांगारे (११४) ८४१३८९५, वीर (९६) ४१७२२७९, श्रीनाथ म्हस्कोबा वीर (२०) ७९३१२९, तोंडल (४०) १९१५०५१, माहूर (१५९) १०६६२३३५, पानवडी (१६) ९८४०७३, यादववाडी (९०) ४७९६५८०, वाघापूर (८९) ६०७१४२८, टेकवडी (१७४) १५६६५१२३, गुरुळी (६५) ३५१६४७१, आंबळे (७७) ५०३१४५२, चांबळी (१४७) ७०९१६५०, गराडे (१८६)१५२७५०७८, सोमर्डी (५६) ४९६२८१६, बोपगाव (१७२) १३५००१९३, भिवरी (२०९) १४६७०७१०, कोडीत (१२५) ८७४३२२०, थापेवाडी (३) २५२५८१, शिवरी (११६) ९४७४४१८, खळद (११७) ८९८१९८२, वाळुंज (३८) २८२५७४५, नायगाव (२१२) २२५०४०३३, सिद्धेश्वर नायगाव (५७) ६३९९५९, माळशिरस (४६७) ४१७१३७७३, पिंपरी (१०५) १०११८४३६, रीसे (१९२) १८४७२६९६, पिसे (१३७) ११०७७०५७, चंद्रानंद पिसर्वे (३७) २८७७९४४, पिसर्वे (७६) ५८८४२८५, राजुरी (४६७) ४५८७९४१५, पोढे (११०)९०७१५८८, मावडी सुपे (८७) ९१८४४८३, धनकवडी (५३) २५८६८५९, बांदलवाडी (५५)२१४५०३७, काळदरी (६६) ४९२८०२७, दवणेवाडी (२४)१२३२४८७, मांढर (१०५) ७१६०६२५, मांडकी नंबर 2 (४१) २४०५५६७, ज्योतिर्लिंग मांडकी (२३) १५४४२४२ या विविध कार्यकारी सोसायटी यांना हि प्राप्त होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव यांच्याशी संपर्क करून तात्काळ आधार लिंक करून घेण्यात यावे. असे आव्हान गायकवाड यांनी केले आहे.