विश्‍लेषण : राधाकृष्ण विखे – पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार असल्याने त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री शिंदे यांचे विश्वासातील मानले जाणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे व त्यांचे कुटुंबीय विरोधी पक्षात असताना विरोध करू शकले नाही. परंतु पुत्र भाजपचा खासदार व पती गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी झटका दिला आहे. एका माजी सैनिकाच्या पत्नीच्या बदली प्रकरणात थेट माने यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असल्याची घोषणा केली आहे.

माने यांच्यावर अविश्वास ठराव येणार असल्याने पालकमंत्री राम शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. माने यांचा बचाव कसा करायचा, या विचारात पालकमंत्री शिंदे आहेत. दुसरीकडे विखे समर्थकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्ष जिल्हा परिषद विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांचा बळी जाऊ लागल्याने यापुढे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी सावध भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.

माने यांच्यावरील अविश्वास ठरावावरून पालकमंत्री शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील अंतर्गत संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याकडूनही विखे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु सध्या शिंदेही बघ्याच्या भूमिकेत आहेत, तर विखे हे आक्रमक भूमिकेत आहेत. अशा परिस्थितीत नेमके काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 ‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like