‘सवयी एका रात्रीत बदलत नाहीत’, राधाकृष्ण विखे पाटलांना मिळाला ‘हा’ धडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. एका रात्रीत एखादे सरकार पडते. एका रात्रीतून एका संस्कृतीतून दुसरा संस्कृतीत उडी मारतो. रात्रीत पक्षांतर केले तरी वर्षानुवर्षे शरीराला आणि मनाला पडलेल्या सवयी अशा एका रात्रीत जाता जात नाही, हा धडा अर्ध शतकापासून काँग्रेसमध्ये असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वत:च्या कृतीतून मिळाला आहे.

नगरमधील तिकीटावरुन त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपची कास धरली व खासदारही झाले. त्यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखेही भाजपवासी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगेचच कॅबिनेट मंत्री केले. मात्र, इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या विखे पाटलांना हा बदल लगेजच अंगवळणी पडला नाही.

विधानभवनातील माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात अधिवेशन काळात सकाळी सगळे विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी बसून मिटींग घेतात. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राधाकृष्ण विखे पाटील सवयीप्रमाणे वळसे पाटील यांच्या दालनात गेले. तेव्हा दालनात अगोदरच असलेल्या वळसे, अजित पवार यांना आश्चर्य वाटले. पण कोणी काही बोलून दाखविले नाही. दालनात गेल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली. विखे येताच दिलीप वळसे, अजित पवार व अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर थोडावेळ बसून विखे तेथून निघून गेले.

म्हणतात ना, तुम्ही कितीही आव आणला तरी मनाला पटले पाहिजे, मनाला पटले तरच ते शरिराला पटते. राधाकृष्ण विखे पाटील यांना हा धडा मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीतही अनेकदा पक्षांतर केलेल्यांना याची प्रचिती आली होती. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही प्रचारसभेत कमळाला मत द्या असे म्हणण्याऐवजी सवयीने घड्याळाला मत द्या असे म्हटले होते. रात्रीत पक्ष बदलला तरी मनाला एका रात्रीत बदलता येत नाही हेच खरे.

आरोग्यविषयक वृत्त –

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा