विखे यांच्या मंत्रिपदाला हरकत घेणारी याचिका उच्च न्यायालयात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांच्या मंत्रिपदा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांना दिलेल्या मंत्रिपदामुळे राजकीय भ्रष्टाचार बोकाळेल, असेही याचिकाकर्ते सतीश तळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे–पाटील यांच्याकडे भाजपाने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. १७ जून रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

विखे यांना दिलेल्या मंत्रीपदावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल सभागृहात हरकत घेतली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मंत्रीपद दिले असल्याचे सभागृहात सांगितले होते.