राधाकृष्ण विखे – पालकमंत्री शिंदे यांच्यात अंतर्गत ‘संघर्ष’ ! CEO मानेंवर अविश्वास आणून ‘कुरघोडी’ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने हे पालकमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील मानले जातात. विखे यांना त्यांच्या विश्वासातील मुख्य कार्यकारी अधिकारी हवे असतात. माने यांनी नगर जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासून अध्यक्षा शालिनीताई विखे व माने यांच्यात कायमच विसंवाद राहिला.

परंतु राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षात असल्यामुळे अंतर्गत विसंवाद त्यांनी कधी चव्हाट्यावर येऊ दिला नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील सुजय विखे यांचा झालेला विजय व राज्यमंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे-पाटील यांची लागलेली वर्णी, यामुळे विखे यांना बळ मिळाले आहे. राम शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी अपंग माजी सैनिकाच्या शिक्षक पत्नीच्या बदलीवरून काल अध्यक्षा विखे यांनी स्वत: जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून काढता पाय घेतला. त्यानंतर माने यांच्यावर अविश्वास ठरावाची घोषणा केली. त्यासाठी आठ जुलै रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. माने यांच्यावर अविश्वास ठराव आणून पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेतील या राजकारणावरून पालकमंत्री शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

भाजपने जिल्ह्यात दोन मंत्री दिले असून, दोन्हीमध्ये वर्चस्वावरून सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षात शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like