राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी नावाच्या सुनामी मध्ये  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. एवढेच नाही तर जे काँग्रेसचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदार संघात देखील काँग्रेसचा पराभव झाला. ही बाब काँग्रेस करिता  धक्कादायक आहे. त्यामुळेच आज दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीबैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकीला यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आजाद, पंजाबचे  मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह असे काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.  या बैठकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. पण, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी आणि इतर वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप तो काँग्रेसच्या कार्यकारिणीने तो फेटाळला.