नेते फक्त निवडणुकी पुरते आले, राहुल दादा मात्र अडचणीवेळी धावून आले.. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या वरवंड येथील नबीभाई यांची आपबीती..

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुका आल्यावर नेते भेटायला येतात, राहुल दादा मात्र अडचणीच्यावेळी आरोग्यदूत म्हणून धावून आले आणि आमच्या नबीभाईचे प्राण वाचले, दादांची वेळेवर मदत मिळाली नसती तर आज आम्ही भावाला मुकलो असतो. अशी आपबिती सांगितली आहे दौंड तालुक्यातील धायगुडेवाडी, वरवंड येथील हुसेनभाई शेख यांनी.

 

नबीभाई शेख हे हुसेनभाई यांचे मोठे बंधू एक दिवस अचानक त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांची त्वरित बायपास सर्जरी करावी लागेल असे सांगितले. गरीब शेतकरी कुटुंब असल्याने ऐनवेळी दिड दोन लाख रुपये आता आणायचे कुठून आणि शस्त्रक्रिया कशी करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.त्याचवेळी कुणीतरी राहुल दादांना फोन लावा असे म्हणाले आणि घरातून एकाणे दादांना फोन लावला.

दादांनी माहिती घेऊन पेशंट त्वरित पुणे येथील देवयानी हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले तेथे नबी भाईंवर बायपास शस्त्रक्रिया होऊन ते आज ठणठणीत बरे झाले. शस्त्रक्रिया आणि इतर औषेधपचार असा सुमारे दोन लाखांच्यापुढे खर्च आला मात्र ऐनवेळी राहुल दादांसारखा आरोग्यदूत धावून आला आणि सर्व खर्च हा दादांनी दिलेल्या आरोग्यनिधीतून झाला आणि आमच्या भावाचे प्राण वाचवून गेला त्यामुळे दादा हा आमच्यासाठी मोठा आधार ठरला अशी भावना यावेळी हुसेनभाई यांनी व्यक्त केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी