‘हा’ पण चौकीदार झोपलेलाच, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या व्यंगचित्रातून विरोधकांर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘चौकीदार’ या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. देशाचे हजारो कोटी रुपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडली देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना समाजमाध्यमांवर त्यांच्या नावासमोर ‘चौकीदार’ लिहून प्रसिद्ध केले आहे. मनसे अधिकृतवरुन हे व्यंगचित्र शेअर केले आहे.

‘बँक ऑफ विश्वास’ अशा नावाची बँक या व्यंगचित्रात दाखवण्यात आली आहे. तर नीरव मोदी, मल्ल्या असे घोटाळेबाज गैरव्यवहार करुन पैसे घेऊन पळून जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. बँकेच्या बाहेरच्या बाकड्यावर मोदी व जेटली ‘चौकीदार’च्या रुपात झोपा काढत आहेत. सामान्य ठेवीदार म्हणत आहेत, की आधीचे नालायक आहेत असे सांगितले म्हणून आपण वॉचमन बददला पण हेही झोपाच काढत आहेत. असे व्यंगचित्र काढून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ असं म्हणत मोदींवर टीका केली होती. तर भाजपने आता ‘मैं भी चौकीदार’ असे कॅम्पेन सुरू केले आहे. काल पासून भाजप मधील सर्व मोठ्या नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ लावून आपली नावे बदलली आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच राज यांनी व्यंगचित्र काढत पुन्हा एकदा मोदींना टोला लगावला आहे.