विजय निश्चित, धाकधूक नाही ; राजू शेट्टी Confidant

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुकीत आमचे दोन्ही ठिकाणचे उमेदवार निश्चित विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना कोणतीही धाकधूक असण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्टीकरण खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार आहे.

यापार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार राजू शेट्टी यांनी गतवेळच्या मताधिक्क्यापेक्षा जास्त मताधिक्क्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तर हातकणंगलेमधून स्वतः राजू शेट्टी हे यंदा लोकसभेच्या रिंगणात होते.

एक्झिट पोलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळणार असल्याचे दाखविण्यात आले आहे ,त्यामुळे शेट्टींचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना शेट्टी म्हणाले कि, मतदारांच्या मनात काय आहे ,हे आम्हाला चांगले माहित आहे. आता फक्त आम्ही निकालाची प्रतीक्षा असून कुठलीही धाकधूक असण्याची काही एक गरज आम्हाला नाही कारण आमचे दोन्ही ठिकाणचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार आहेत,अशी शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सट्टा खेळणारेच बरबाद

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता लागणार आहे मात्र गेले तीन दिवस एक्झिट पोलवर अंदाज जाहीर झाले. मुळात हे जाणीवपूर्वक पसरविले जाते ,जेणेकरून सट्टेबाजांना मालामाल करण्यासाठीच हे एक्झिट पोल असतात. दुर्दैवाने सट्टा खेळणारे बरबाद होतात तर सट्टा घेणारे मालामाल अशी प्रतिक्रियाही राजू शेट्टी यांनी यावेळी दिली.