राम मंदिर, ‘मक्केत किंवा व्हॅटिकनसिटी’ मध्ये बांधा असे आम्ही म्हणत नाही : योगगुरू रामदेवबाबा

नांदेड : वृत्तसंस्था – योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावरून भाष्य केले आहे. राममंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तो काही राजकीय प्रश्न नाही. अयोध्येत राम मंदिर उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर मक्केत किंवा व्हॅटिकनसिटीमध्ये बांधा असे आम्ही म्हणत नाही,असे ठोस प्रतिपादनही बाबा रामदेव यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक शिबिराच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस ते संबोधित करीत होते. यावेळी रामदेवबाबा म्हणाले कि, राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे आणि तसे झाले नाही तर जनताच राम मंदिर बनवेल. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि राम हे देशातील प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूचे, मुसलमानाचेही पूर्वज आहेत. १९४७ पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे हिंदू आणि मुसलमान यांचा ‘डिएनए’ एकच आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा