भर सभेत दानवेंचं ‘खिचडी’ पुराण ; स्वतःच्या पत्नीची उडवली खिल्ली !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) –  सोनिया गांधी आपले भाषण वाचून करतात. त्या देश चालवू शकत नाहीत. देश चालवण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेसवर हल्ला बोल केला. ते लातूर येथील भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले, लग्नानंतर माझ्या बायकोला स्वयंपाक करायला येत नव्हता. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी तीला माहेरी पाठवलं. दोन महिन्यानंतर माहेरहून परत आल्यावर तिला मी खिचडी करायला सांगितलं. तेव्हा तिनं पुस्तकात बघुन खिचडी करायला सुरुवात केली. पुस्तकात लिहील्याप्रणाने तिनं अर्धा लिटर पाणी टाकलं, तांदूळ टाकले, बाकी सर्व साहित्य टाकलं. मात्र स्टोहो सुरु करावा लागतो हे त्यात लिहिलं नव्हतं. तिने अर्ध्यातासानंतर पाहिलं तर खिचडी झाली नव्हती. ज्याप्रमाणे वाचून खिचडी बनवता येत नाही तसंच भाषण वाचून देश चालवता येत नाही असं म्हणत दानवे यांनी आपल्या शैलीत उदाहरण देऊन सोनिया गांधींवर टीका केली.

दरम्यान, सोनिया गांधीवर टीका करताना दानवे यांनी आपल्याच पत्नीची खिल्ली उडवल्याची चर्चा सभेमध्ये सुरु होती.

Loading...
You might also like