शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभा लढणाऱ्या रत्नाकर पवार यांचा फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

कोंढव्यातील व्यावसायिकाची केली 1 कोटी 64 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते प्रकल्पात न गुंतविता फसवणुक केल्याप्रकरणात रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

रत्नाकर पवार यांच्यावर अनेक ठिकाणी फसवणुक केल्याचे गुन्हे तसेच धनादेश न वटल्याचे खटले सुरु आहेत. त्यांची पत्नी भाजपच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती असून सध्या त्या सदस्य आहेत. रत्नाकर पवार यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

याप्रकरणी मोहद्दीस मंहम फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी रत्नाकर पवार (रा. शिवनेरी, महात्मानगर, नाशिक), त्यांच्या पत्नी मनीषा रत्नाकर पवार, अनिस वली महंमद मेमन (रा.कोंढवा) प्रकाश पासाराम लड्डा (नाशिक), रवींद्र सिंह त्यांच्या पत्नी सोनिया सिंग  (रा. वॉटर फ्रंट सोसायटी , कल्यानीनगर, पुणे), अशोक परशुराम अहिरे (रा. पंचवटी, नाशिक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार २९ एप्रिल २०१७ ते ६ जुलै २०१८ दरम्यान घडला.

रत्नाकर पवार त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार, कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक( गुन्हे ) महादेव कुंभार व वकील महेश झंवर यांनी अटकपूर्व जामीनाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीकडून व्यावसायिकांची १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. या प्रकरणातील कोंढवा पोलिसांनी प्रकाश लड्डा यांना अटक केली होती. आरोपी लड्डा यांनी काही रक्कम परत केली आहे. न्यायालयाने लड्डा यांचा जामीन मंजूर करण्यात आले आहे .

रत्नाकर पवार हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. त्यांची पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  या प्रकरणातील आरोपी अनीस वली मोहम्मद, रवींद्र सिंग आणि सोनिया रवींद्र सिंग यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने अगोदरच फेटाळले आहेत.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. याप्रकरणी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे ,सहाय्यक  पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार तपास करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/