Video : नेत्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन : विष्णू बुरगे (प्रतिनिधी) – उस्मानाबाद चे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्त्याने रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सर्व राजकीय पक्षाच्या जागा घोषित होत असताना पक्षांना आता कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. यातच उमरगा येथे आयोजित सभेत एका कार्यकर्त्यांने स्वतःच्या आंगावर रॉकेल ओतून घेऊन रवींद्र गायकवाड यांनाच शिवसेनेची उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.

नुकत्याच घोषित उमेदवारीमुळे राज्यात अनेक नाट्यमय प्रसंगाला उधाण आले आहे. याचाच एक भाग म्हणून उमरगा येथे आयोजित सभेत बाबा भोसले या रविंद्र गायकवाड समर्थकाने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो कार्यकर्ता शांत झाला. माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचे तिकीट का दिले याचाच सूर या बैठकीत पाहायला मिळाला. परंतु पक्ष प्रमुखावर याचा किती प्रभाव पडतो हे पाहणेही तितकेच गरजेचे ठरणार आहे.

अनेकवेळा आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी आसा आग्रह कार्यकर्त्यांचा असतो. मात्र, अशा घटना घडल्यानं पक्षाला ही विचार करण्याची गरज आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र कुठलाही पक्ष जिंकणारा उमेदवार मैदानात देण्याचा प्रयत्न करते आणि मग अशा घटना समोर येतात.

[youtube https://www.youtube.com/watch?v=HL7A8ASvtiI]