11 वर्षांनी मोठ्या असलेल्या ‘या’ अभिनेत्रीसोबत ऋषभ पंतला जायचंय ‘डेट’वर ..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऋषभ राजेंद्र पंत हा भारतीय क्रिकेट संघातील एक चमकदार चेहरा म्हणून ओळखला जातो. ऋषभचा जन्म हरिद्वार मधील उत्तराखंड येथे झाला आहे, असे असूनही ऋषभ पंत दिल्ली कडून क्रिकेट खेळत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषभ पंत ने एक खळबळजनक इच्छा व्यक्त केली होती जी ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल.

एका मुलाखती दरम्यान ऋषभ पंतला विचारण्यात आलं होत की, जर तुम्हांला एखाद्या अभिनेत्री सोबत डेट वर जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला घेऊन जाल ? यावर ऋषभ पंत ने एक आश्चर्यकारक नाव सांगतलं आणि ते नाव होत अभिनेत्री ‘श्रद्धा कपूर’चं. ऋषभ पंत श्रद्धा कपूरचा खूप मोठा चाहता आहे त्यामुळे त्याला तीला डेट वरती घेऊन जायला आवडेल असं पंतने यावेळी सांगितले.

हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की , श्रद्धा कपूर ऋषभ पंत पेक्षा ११ वर्षांनी मोठी आहे, मात्र ऋषभ श्रद्धा चा मोठा चाहता असल्याने तिने ही इच्छा सहज व्यक्त केली. २१ वर्षीय ऋषभ पंत सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे आणि वेस्टइंडीजमध्ये होणाऱ्या सर्वच सामन्यांमध्ये तो खेळणार आहे. पंत हा भारतीय क्रिकेट टीम मधील एक तरुण चेहरा आहे.