या चिमुकलीचे अप्रतिम रॅम्प वॉक…भल्याभल्या मॉडेल्स ही होतील थक्क

 पोलीसनामा ऑनलाइन टीम – रायझिंग स्टार सीजन 4 या पुण्यात आयोजित केलेल्या चिमुकल्यांच्या फॅशन शोमध्ये पलाक्षी दाश या 6 वर्षीय चिमुकलीने विजेतेपदाचा मुकुट जिंकला. कशिष प्रोडक्शन आणि योगेश पवार यांच्यावतीने या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यात वर्ष 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुला मुलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पारंपारिक आणि पाश्चात्य अशा दोन राउंड घेण्यात आले. या दोन्ही राऊंडमध्ये पलाक्षीचा परफॉर्मन्स अप्रतिम होता.

चिमुकल्या पलाक्षीचा रॅम्प वोक तर अप्रतिम होता. मोठमोठ्या मॉडेल्सना ही लाजवेल अशी अदाकारी तिने केली. आणि प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. वडील अनिल कुमार दास आणि आई रेश्मा दास यांच्याकडून तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. या स्पर्धेत पलाक्षी सोबतच प्रिया कोसमकर फेरी सैनी, सूर्या सिंग, रोनक सिंग विजेते ठरले. या कार्यक्रमाचे सहा नृत्यदिग्दर्शिन भाग्यश्री बोरसे, अलंकृता शहा, निखिल बहार वाल यांनी केलं. यावेळी अभिनेते विशाल घोलप सोनल कौर, पौर्णिमा लूनावत उद्योजिका व्योमा गौर व बांधकाम व्यवसायिक उमेश पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

You might also like