राष्ट्रवादीत अंतर्गत ‘गटबाजी’ वाढली ; पवार घराण्यातील उमेदवाराला विरोध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. तर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जमखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली. रोहित पवार हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र रोहित पवार यांच्या उमेदवारीला पक्षातीलच नेत्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढल्याचे दिसत आहे.

कर्जत-जामखेड विधासनभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मतदारसंघातील मतदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि भेटीगाठी सुरु केल्या आहेत. रोहित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काहींचा पाठिंबा आहे तर काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हाअध्यक्ष मंजुषा गुंड यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी ही मागणी केली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून मंजुषा गुंड यांचा विजय नक्की असल्याचे परहर यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसचा एकही सदस्य जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये नाही. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे.

राष्ट्रवादीने गुंड यांनाच उमेदवारी द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी या मतदारसंघात दोन वर्षापासून कामे करण्यास सुरुवात केली आहे. विविध विकास कामे करत असातना त्यांनी मतदरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे त्यांनी आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

रोहित पवार यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत आहे. त्यातच राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदावारी दिली. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like