‘या’ रोहित शर्माच्या सासूबाई, कोणाचाच ‘विश्‍वास’ बसेना ; म्हातारपणात देखील दिसतात एकदम ‘झक्‍कास’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वयोमानाने आपल्या त्वचेवर आणि शरीरात अनेक बदल होत असतात. मात्र वय कितीही असो त्यांचे तेज आणि सुंदरता काही कमी होत नाही असे अनेक लोक असतात. त्यांच्या दिसण्यावरून वयाचा अंदाज लावता येत नाही. आपल्या भारतीय संघाचा उपकर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा याची बायको सर्वांना माहित आहेच. रितिका दिसायला सुंदर आहेच. मात्र तिची आई टीना सजदेह यांच्या वयोमानाने खुपच सुंदर दिसतात, हे तुम्हाला माहित आहे का?

टीना सजदेह त्यांच्या लुकवरुन त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. रोहीत शर्माच्या सासूबाई टीना या रितीकाची मोठी बहिण असल्यासारख्या वाटतात. त्या अद्यापही एकदम फिट आणि फाईन आहेत. त्यामुळे रितिकाच्या आईला पाहून अनेकांना धक्केही बसतात. रितिका जशी दिसण्यास सुंदर आणि हॉट आहे, तशीच तिची आई दिसते.

दरम्यान, रोहित शर्माही हँन्डसम दिसतो. त्यामुळे मुलींमध्ये त्याचा चाहतावर्ग आहेच. तसंच रितिकाच्या सुंदरतेमुळे तिचाही वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. त्यात रितिकाच्या कुटुंबाचे वेगळे सांगायला नको. रितिकाची आईच नाहीतर वडिलही अद्यापही एकदम फिट असतात आणि दिसतात.

You might also like