रूपाली चाकणकरांना प्रमोशन ? राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहर अध्यक्षपदी स्वाती पोकळेंची नियुक्‍ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या विविध सेलच्या अध्यक्षांची नव्याने नियुक्त्या करण्यात येत असल्याचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी आज जाहीर केले. यामध्ये महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर यांच्या जागी स्वाती पोकळे यांची वर्णी लागली आहे.

या बाबत शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनेच्या अध्यक्षाच्या नियुक्त्या अचानक झालेल्या नाहीत. या निवडीची प्रक्रिया सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. तसेच इच्छुक कार्यकर्त्यांकडून या पदांसाठीचे अर्ज पक्षाने रीतसर मागवले होते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या नेमणुका होणार होत्या. परंतु निवडणुकांच्या धामधुमीमुळे निर्णय थोडा प्रलंबित पडला. तर काही दिवसापूर्वी या सर्व मावळत्या अध्यक्षांची मिटींग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ऑफिसमध्ये झाली. त्यामध्ये या सर्व अध्यक्षांना बदलाची कल्पना पक्षाच्यावतीने देण्यात आली होती. तसेच रूपाली चाकणकर यांच्या जागी स्वाती पोकळे यांना संधी देण्यात आली असली तरी पक्षाच्या वतीने रूपाली चाकणकर यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे
राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वाती पोकळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश हांडे
राष्ट्रवादी विद्यार्थी विशाल मोरे
राष्ट्रवादी युवती काँग्रेस अश्विनी परेरा
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस अजीम गुडाकुवाला
राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल राजेंद्र कोंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल समीर निकम
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमोद रणवरे
राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल ययाती चरवड
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल शंकर शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल सुकेश पासलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल अल्ताफ शेख

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या