OMG ! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी ; भाईजानने वेळीच केले सावध

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या नावावर चक्क त्याच्या चाहत्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील बिजगौर येथे सुरु होता. विषेश म्हणजे एका वृत्तपत्रात ‘being human’ इव्हेंटची खोटी जाहिरात प्रकाशित करण्यात आली. हा प्रकार सलमानच्या लक्षात आल्यावर त्याने वेळीच हजारो चाहत्यांना सावध केले.

आजुबाजुला होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारापासून बॉलिवूड कलाकारांना सावध रहावे लागते. अनेक लोक यांच्या नावावर ठगबाजी करत असतात. असाच एक फसवणूकीचा प्रकार चक्क सलमान च्या नावावर झाला आहे. त्याच्या नावावर उत्तर प्रदेशात चाहत्याकडून पैसे घेतले. व सलमान ने सोशल मिडियाच्या अकाऊंटवर एका इव्हेंटचे फोटो शेअर केले. हा इव्हेंट सलमानच्या ‘being human’ या फाऊंडेशनद्वारे आयोजित केला जात आहे. असा दावा या बॅनरमध्ये करण्यात आला. इतकेच नाही तर स्वतः सलमान या इव्हेंटला उपस्थित असल्याचा दावा ही केला गेला.

या इव्हेंटचे पोस्टर आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर करत सलमाने सांगितले की, असा कुठलाही इव्हेंट होणार नाही. मी माझ्या ‘being human’ अशा कुठल्याही इव्हेंटमध्ये सहभागी नाही. हा फसवणूकीचा प्रकार वेळीच सलमानच्या लक्षात येताच त्याने हजारो चाहत्यांना सतर्क केले. व त्यांची फसवणूक टळली.

सध्या सलमान खान ‘भारत’ या सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय ‘दबंग 3’मध्ये तो बिझी आहे. या सिनेमाचे शुटिंग पुर्ण होताच संजय लिला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’चित्रपटाचे शुटिंग ला सुरुवात करणार आहे.