सलमानच्या चाहत्यांसाठी धमाकेदार OFFER , ‘भारत’ पाहणाऱ्यांना मिळणार ‘या’ गोष्टी FREE

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भारत हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. सलमानच्या जादूने चाहते पुन्हा मंत्रमुग्ध झाल्याचे दिसत आहे. सलमानच्या एका चाहत्याने तर कमालच केली आहे.

तो आपल्या हिरोचे वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील ऑटो रिक्षा ड्रायव्हरने जे भारत सिनेमा पाहायला जात आहेत त्यांच्यासाठी फ्री राईड ठेवली आहे. या फ्री राईडचा लाभ तुम्ही भारत सिनेमाचे तिकीट पाहून घेऊ शकत होतात.

या ऑटो रिक्षावाल्या प्रमाणेच मुंबईतील एका रेस्टॉरंटवाल्यानेही भारत सिनेमाच्या नावानेच आपल्या रेस्टॉरंटचे नाव ठेवले आहे. याशिवाय जर कोणी सिनेमाचे तिकीट दाखवत असेल तर त्याला जेवण फ्री देण्याची स्किम ठेवली आहे. याशिवाय बांद्र्यात असणाऱ्या भाईजान या हॉटेलने भारत सिनेमा पाहणाऱ्यांसाठी जेवणावर 25 टक्के सूटही दिली आहे.

या सिनेमात सलमान खान, दिशा पाटनी आणि कॅटरीना कैफ प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या तिघांशिवाय तब्बू , जॅकी श्रॉफ, आसिफ शेख, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर हेदेखील दिसणार आहेत. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.