दिशा पाटनीने तोडली सलमान खानची ‘नो किसिंग’ पॉलिसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे सिनेमे अ‍ॅक्शनने भरलेले असतात. सलमान कधीच ऑनस्क्रिन किस किंवा इंटिमेट सीन करत नाही. सलमानने एक नो किसिंग पॉलिसी बनवली आहे. सलमान क्वचितच एखाद्या सिनेमात हिरोइनला किस करताना किंवा इंटिमेट सीन करताना दिसत आहे. परंतु आता असं दिसत आहे सलमानच्या नो किसिंग पॉलिसीला अभनेत्री दिशा पाटनीने तोडले आहे.

सध्या दिशा पाटनी भारत या सिनेमात सलमान खानसोबत दिसणार आहे. नुकताच भारतचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नुकतंच या सिनेमातील स्लो मोशन हे गाणंही रिलीज झालं आहे. यात दिशा आणि सलमान दिसत आहेत. यातील सलमान आणि दिशाच्या हॉट केमिस्ट्रीला चांगलीच पसंती मिळत आहे. तु्म्ही जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की, या गाण्यातील एका सीनमध्ये दिशा सलमानला किस करताना दिसत आहे.

सलमानने जरी स्वत: दिशा किंवा अन्य कोणत्या हिरोइनला किस केला नसला तरी, तसं पाहिलं तर एका अर्थाने मात्र दिशाने तर सलमानचा हा क्लॉज तोडला आहे.

भारत या सिनेमात सलमान खान दिशा व्यतिरीक्त कतरीना सोबतही रोमांस करताना दिसत आहे. या सिनेमात या तिघांशिवाय तब्बू , जॅकी श्रॉफ, आसिफ शेख, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर हेदेखील दिसणार आहेत. अली अब्बास जफर हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 5 जून रोजी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like