घेतला वसा ‘चंदन’ संवर्धनाचा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – गणरायाला निरोप देण्यात सर्व गणेश भक्त व्यस्त असताना मुरबाड तालुक्यातील रावगाव मधिल ग्रामस्थांनी आपल्या गावात हरित क्रांती करण्यासाठी चंदन वृक्षांची पालखी काढुन वृक्ष लागवड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला.

या चंदन वृक्ष दिंडी पालखी सोहळ्यात मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ, भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुरेश बांगर, पर्यावरण प्रेमी भरत गोडांबे, चंदन महासंघाचे श्रीकांत गोरे, संपर्क अधिकारी पंकज चव्हाण, आजी बाई, शाळेचे निर्माते योगेंद्र बांगर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

ग्रामीण भागात वृक्ष लागवडीची संकल्पना हि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे म्हणुन जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती मुरबाड यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील रावगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या चंदन परिषदेचे ग्रामस्थांनी वृक्षाची पालखी काढुन गावात स्वागत केले.

या चंदन परिषदेत चंदन महासंघाचे श्रीकांत गोरे यांनी चंदन लागवडीमुळे शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन कसे निर्माण होते या संदर्भात माहिती दिली. चंदन लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांचा सहभाग व्हावा म्हणुन शासन दर शंभर झाडांची लागवड करण्यासाठी 52 हजाराचे आनुदान देते. त्यामुळे या चंदन परिषदेची संकल्पना मुरबाड तालुक्यात सर्वत्र राबविली जाईल व सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. आत्मविश्वास नागरिकां मध्ये निर्माण झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like