१६ लाखांच्या शेअर्सची परस्पर विक्री, एकावर गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शेअर्सची परस्पर विक्री करून तब्बल 16 लाख 39 हजार 380 रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव अवाण्णा बामणे (रा. बसरगी, जत) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

इनाम धामणी (ता. मिरज) येथील निलेश श्रीशैल्य माळी यांनी फिर्याद दिली आहे. माळी यांचे आजोबा रामचंद्र माळी यांनी रत्नाकर बॅंकेचे शेअर्स घेतले होते. त्यानंतर शेअर्सची किमत 614 रूपये झाली. त्यामुळे ही रक्कम 16 लाखांची झाल्याने त्यांनी शेअर्स विकण्याचे ठरवला.

त्यांनी बामणे याच्याशी सम्पर्क साधला. तो राजस्थान येथील आनंद शेअर्स कंपनीचा एजंट होता. रक्कम काढण्यासाठी कागपत्रे तयार केली. आणि त्याने शेअर्स विकले. याबाबत रामचंद्र यांनी नातू निलेश यास माहिती दिली होती. दरम्यानच्या काळात रामचंद्र यांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी निलेश यांनी शेअर्सच्या पैशांबाबत महादेव बामणे यांना विचारणा केली. त्यांनी उत्तर दिले नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शनिवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –