सांगलीतील गुन्हेगार 2 जिल्ह्यांतून हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – मारहाण, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारास 6 महिन्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सूरज अतुल पारेख (वय 24, रा. आपटा पोलिस चौकीजवळ) असे त्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मंजुरीनंतर मंगळवारी प्रांताधिकारी यांनी त्याला हद्दपार करण्याचे आदेश दिले.

पारेख याच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या होत्या. त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याच्याकडून गम्भीर गुन्हे घडण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्रामबाग पोलिसांनी त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव अधीक्षक शर्मा यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली.
विश्रामबागचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डी. बी. पिसाळ, गुंड्या खराडे, दीपक परीट, महेश वत्रे यांनी कारवाईत भाग घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –