सांगलीत 13 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगली शहरचे निरीक्षक मिलिंद पाटील यांची मिरज वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर संजयनगरचे निरीक्षक अजय सिंदकर यांची सांगली शहरमध्ये बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिले आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव कंसात बदलीचे ठिकाण, सहाय्यक निरीक्षक एम. एस. काळगावे (कुंडल ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभाग), ए. एस. माने (जत ते विशेष शाखा), डी. बी. पिसाळ (विश्रामबाग ते पैरवी अधिकारी), डी. बी. तळपे (मिरज ग्रामीण ते इस्लामपूर वाहतूक शाखा), यु. एम. दंडीले (तासगाव ते आवेदन शाखा), एस. के. हारुगडे (भिलवडी ते एलसीबी), ए. एस. पाटील (कवठेमहांकाळ ते गुप्तवार्ता), पी. ए. देशमुख (सांगली शहर ते महिला कक्ष), संगीता माने (नियंत्रण कक्ष ते कुंडल), कैलास कोडग (एलसीबी ते भिलवडी), एस. व्ही. वागलगावे (महिला कक्ष ते सांगली शहर), काकासाहेब पाटील (प्रभारी अधिकारी संजयनगर), उपनिरीक्षक डी. एस. विटेकर (संजयनगर ते मिरज ग्रामीण).

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी दिले आहेत.

You might also like