‘तोडपाणी’ फेम लोकांकडून चालते आलिशान गाड्यांमधून ‘गस्त’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्री गस्त घातली जाते. यासाठी शासकीय किंवा खासगी वाहन वापरले जाते. मात्र सांगलीत मात्र आलीशान गाड्यांमधून गस्त घालणारे अनेकजण आहेत. विशेष म्हणजे यातील एकही कलेक्शन फेम नाही.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून सांगली जिल्ह्यात रात्रीची गस्त काटेकोरपणे घातली जाते. त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. खात्यातील प्रत्येकाला रात्रीची गस्त घालावीच लागते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही नियमितपणे गस्तीवर दिसतात. पण नेहमीच बदनाम केल्या जाणाऱ्या कलेक्शन फेम लोकांपेक्षा तोडपाणी फेम लोक या गस्तीवर स्वतःच्या आलिशान गाडीतून गस्त घालतात.

ही बाब अनेकदा उघडकीस आली आहे पण संबधित लोक त्यावर नेहमीच पांघरूण घालत आले आहेत. पोलीस दलात कलेक्शन फेम असल्याचे सांगून अनेकांना बदनाम केले जाते. मात्र या तोडपाणी फेम लुटारूंवर कोणतीच कारवाई होत नाही. विशेष म्हणजे मला कोणी ब्लॅकमेल केले तर त्याची गेम करू अशी धमकीही त्यांच्याकडून हस्तेपरस्ते दिली जाते. कलेक्शन पेक्षा अधिक ते तोडपाणी करून मिळवतात म्हणूनच त्यांचे फावले आहे.

आलिशान गाड्यांमधून फिरून ते रात्रीचे कलेक्शन करतात. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –