गुन्हे शाखेकडून दुचाकी चोर गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जत येथील यल्लम्मा यात्रेतून दुचाकी चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राजू उर्फ दत्तात्रय जगन्नाथ चव्हाण (वय 26, रा. अंजनी, तासगाव) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जत येथे जानेवारी महिन्यात यल्लम्मा देवीची यात्रा होती. यात्रेतील भाविकांच्या दुचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्याची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी एलसीबीच्या पथकास दिले होते.

निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पथक तासगाव, विसापूर, हातनूर, सावळज परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून माहिती संकलित करत होते. त्यावेळी अंजनी येथील राजू चव्हाण याच्याकडे तीन दुचाकी असल्याची माहिती पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार छापा टाकून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केल्यानंतर त्याने त्या दुचकी यात्रेतून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा