‘कार्तिक-सारा’ प्रमोशनसाठी आग्र्याला गेले, चाहते ओरडले ‘भाभी भाभी’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या आगामी सिनेमा लव आज कल 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सारा आणि कार्तिक अनेक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. जयपूरनंतर नुकतेच दोघे आग्र्याला प्रमोशनसाठी गेले होते. यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

कार्तिक आणि सारा यांची बाँडिंग सर्वांनाच माहिती आहे. चाहत्यांनाही ही जोडी खूप पसंत आहे. दोघांच्या रिलेशनशिपची खूप चर्चा होत आहे. परंतु दोघांनी आपलं नातं कबूल केलेलं नाही. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये आग्र्यातील त्यांचे चाहते कार्तिक आणि सारा यांना एकत्र पाहून साराला भाभी ओरडू लागले होते. दोन्ही स्टार्स तेव्हा स्टेजवर उभे होते. यावेळी साराला थोडीशी अस्वस्थ दिसली.

View this post on Instagram

Rahenge Hum Nahi ❤️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सेंन्सॉर बोर्डानं लव आज कल 2 या सिनेमाला यु/ए सर्टीफिकेट दिलं आहे. इम्तियाज अलीला या सिनेमासाठी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. एका रिपोर्टनुसार, या सिनेमाला सेन्सॉरची कात्री लागली आहे. यातील अनेक इंटिमेट सीन कट केल्याचं समजत आहे. सिनेमाच्या सुरुवातीला दिसणाऱ्या किसिंग सीनचा टायमिंगही कमी केला आहे. 14 फेब्रुवारी रोजी वॅलेंटाईन डेच्या निमित्तानं हा सिनेमा रिलीज होणार आहे.

You might also like