अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा ‘गजाआड’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धुळे जिल्ह्यातील लोणखेडी गावात घडली. या प्रकरणी रमेश दिनेश पावरा (पाटील) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत अल्पवयीन मुलगी ही लोणखेडी शिवरातील शेतात राहते. ती शाळा संपल्यानंतर गावातून शेतातील घराकडे जात होती. त्यावेळी रमेश पावरा याने तुला दुचाकीवरुन घरी सोडतो असे सांगून तिला लोणखेडी जवळील उमरा नाल्यात नेले. तेथे तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. नंतर आरोपी रमेश तेथून फरार झाला.

पिडीत अल्पवयीन मुलीने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या आई, वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत घडलेल्या घटनेबाबत पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर तपास करुन पोलीसांनी आरोपी रमेश याला अटक केले. या घटनेमुळे लोणखेडी गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –