सेवा करण्याचा निर्धार, संघर्ष मात्र कायम ; प्रशासनाचा कानाडोळा !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – सेवक संस्थेच्या वतीने HIV/AIDS संक्रमित अनाथ मुलांचे संगोपन व पुनर्वसन प्रकल्प लातुर जिल्ह्यतील हसेगाव येथे राबवला जातो. मात्र गावातील सरपंच भिमाशंकर बावगे हे सुरवतीपासून या प्रकल्पाला विरोध करत आहेत. सेवालय बालगृहाच्या नोंदणी प्रमापत्रासाठी ग्रामपंचायतने टॅक्स भरणे आवश्यक असल्याने 15 मार्च रोजी रीतसर अर्ज केला. मात्र बावगे यांनी विरोध केल्याने टॅक्स भरून घेतला नाही. मागच्या चार वर्षांपासून विद्युत जोडणी होत नाही त्यालाही भीमाशंकर बावगे यांनी विरोध केला आहे. ते वेळोवेळी सेवालय चालवण्यात अडथळा निर्माण करतात त्यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे त्यांना गावातून हाद्दपार करावं या मागणीसाठी सेवालयाचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रवी बापटले उपोषणाला बसले आहेत.

गेली अनेक वर्षांपासून ते लढा रवी बापटले देत आहेत. मात्र, प्रशासन दखल घेत नाही अले दिसते. तात्पुरती कार्यवाही केली जाते मात्र पुन्हा अडवणुक केली जात असल्याचे रवी बापटले यांनी सांगितले. सेवक संस्थेच्या वतीने HIV/AIDS संक्रमित अनाथ मुलांचे संगोपन व पुनर्वसन प्रकल्प राबवला जातो. हा प्रकल्प सामाजीक कार्यकर्ते रवी बापटले गेली अनेक वर्षांपासून चालवत आहेत. लोक सहभाग आणि लोकांकडून मिळणारी आर्थिक आणि इतर मदतीच्या सहाय्याने ते सेवालय चालवतात. यात 50 मुलं आहेत तसेच 30 युवक युवतींचे आतापर्यंत बापटले यांनी पुनर्वसन केलं. शासनाकडे मान्यता मिळावी यासाठीही प्रयत्न केले जात  आहेत. त्यानूसार त्यांनी रीतसर अर्जही केला. मात्र, त्यांनी केलेल्या प्रस्तावात त्रुटी आल्या.

ज्याठिकाणी सेवालय चालते तेथील ग्रामपंचायतीच्या टॅक्सची पावती आणि इतर गोष्टींची पूर्तता करायला सांगितले. टॅक्स भरण्यासाठी त्यांनी हसेगाव ग्रामपंचायतिला अर्ज केला मात्र सरपंच बावगे यांनी अडवणूक केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही टाळाटाळ केली.

आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यास वेळ लागत असल्याने सेवालयाला शासनाच्या सुविधा मिळण्यापासून वंचित रहावं लागेल. अशी भीती रवी बापटले यांना वाटते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधीत कार्यालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली. या सर्व अडचणीमधून प्रशासनाने मात्र मार्ग काढावा व सेवालायातील बालकांना न्याय मिळावा या साठी ते दोन हात करत आहेत.

समाज कार्य करताना अनेक अडथळे येतात मात्र यातून सय्यमाने ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. असा सूर जनतेतून उमटत आहे.