7 वा वेतन आयोग : DA बरोबरच झाली आणखी एक घोषणा, मिळणार 4320 रूपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकारनं नुकतचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट देत महागाई भत्त्यात (DA) मध्ये 5 टक्के वाढ केली होती आणि पेन्शनधारकांनाही फायदा करून दिला होता. तुम्हाला माहिती आहे का, 52 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना महगाई भत्ता वाढवून देण्यासोबतच ट्रान्सपोर्ट अलाऊंस (TA) देखील वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांना 810 रुपयांपासून 4320 रुपये वार्षिक फायदा मिळणार आहे.

जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा सरकरानं शहरांनुसार, ट्रान्सपोर्ट अलाऊंस ठरवला होता. हा भत्ता किमान 1350 रुपयांपासून तर 7200 रुपये प्रति महिना एवढा होता. तसेच लहान शहरात हा भत्ता 900 रुपयांपासून 3600 रुपये महिना इतका आहे. सरकारनं ज्या शहरांना ट्रान्सपोर्ट अलाऊंससाठी निवडलं होतं त्यात हैद्राबाद, पटना, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बंगळुरू, कोच्ची, कोझिकोड, इंदोर, ग्रेटर मुंबई, नागपूर, पुणे, जयपूर, चेन्नई, कोयंबतूर, गाझियाबाद, लखनऊ तसेच कानपूर आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

Visit : Policenama.com