जिवे मारण्याची धमकी देत, शरीर सुखाची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – अजंठानगर चिंचवड येथे महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर लक्ष्मण नागेश धोत्रे (२०, रा. अजंठानगर, चिंचवड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या घरासमोर कपडे धूत असताना लक्ष्मण त्यांना त्रास देत असे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. बुधवारी सायंकाळी लक्ष्मण याने पीडित महिलेशी हुज्जत घालत शरीरसुखाची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता लक्ष्मण याने महिलेच्या घराच्या काचा फोडून महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.