‘उदयनराजेंचे मी बघतो’, शरद पवार यांचे शिवेंद्रराजेंना पक्ष न सोडण्याचे ‘आवाहन’ !

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील अनेक आमदार आणि महत्वाचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजांच्या मानधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पक्ष न सोडण्याची विनंती केली. शिवेंद्रराजे यांनी शनिवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचे मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, असे म्हणत पक्ष न सोडण्याची विनंती केली.

मागील काही दिवसांपासून पक्षातील अनेक आमदार आणि वरिष्ठ नेते पक्षाला रामराम करत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शरद पवार अनेक नाराजांची भेट घेत संपूर्ण राज्याचा दौरा देखील करत आहेत. पुण्यात झालेल्या पवार आणि शिवेंद्रराजेंच्या बैठकीत त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यातील कोल्डवॉर सर्वांनाच माहित आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे काही काळ शांत झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातमीने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

या बैठकीत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंची तक्रार करताना म्हटलं कि, काही व्यक्ती पक्षाच्या विरोधात कारवाई करतात, बोलतात. मात्र पक्ष त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडलेला चांगला.

दरम्यान, पवारांनी त्यांना सबुरीचा सल्ला घेण्यास सांगितल्यानंतर त्यांनी शरद पवार यांना सांगितले कि, ३१ तारखेला मी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून याच्यामध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयाबरोबर जाणार आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेनी राष्ट्रवादी सोडण्याचे नक्की केले असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –