अन्न प्रक्रिया करणार्‍या उद्योगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी योग्य ते निर्णय घेतली जातील : शरद पवार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी, विंचूर येथील शिवसाई एक्सपोर्ट या अन्न प्रक्रिया उद्योगास देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांचे समवेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. अन्न प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेतले जातील असे आश्वासन यावेळेस पवार यांनी दिले.

Vinchur

वाईनचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विंचुर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग युनिट्समुळे परिसराला मोठा फायदा होणार असून रोजगारनिर्मिती होणार आहे. भाजीपाला आणि फळे यावर प्रोसेसिंग करुण त्याची एक वर्षापर्यंत टिकण्याची क्षमता राहणार असून येथून प्रोसेस झालेला शेतमाल हा युरोप आणि रशियाला निर्यात होत आहे.

Vinchur

यावेळी शिवसाई एक्सपोर्टचे चरकुरी शाबाशिव राव, चरकुरी नरेश चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील शेतकऱ्यांचा कंत्राटी शेतीत समावेश असणार आहे. शिव साई एक्सपोर्ट गोठविलेल्या फळे आणि भाजीपाला रशिया व युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करते. विंचूर येथे नवीन अन्न प्रक्रिया उद्योगामुळे संपुर्ण निर्यात ही विंचुर येथील प्रकल्पामधून होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/