‘आई राजा…उदो उदो’ ! श्री तुळजा भवानी ‘शारदीय नवरात्र महोत्सव’ 29 सप्टेंबर पासून

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – श्री तुळजा भवानी शारदीय नवरात्र महोत्सव दि. 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

या शारदीय नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
रविवार, दि. 22 सप्टेंबर – सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा, रविवार, दि. 29 सप्टेंबर – पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12.00 वाजता घटस्थापना, ब्राह्मणास अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्री छबीना.

सोमवार, दि. 30 सप्टेंबर- श्रीदेवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबिना,

मंगळवार, दि.1 ऑक्टोबर- श्रीदेवीजींची नित्‍योपचार पूजा व रात्री छबिना

बुधवार, दि.2ऑक्टोबर- ललितापंचमी श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबिना

गुरूवार, दि. 3 ऑक्टोबर- श्री देवीजींची नित्योपचार पूजा, मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना

शुक्रवार दि. 4ऑक्टोबर- श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना

शनिवार, दि. 5 ऑक्टोबर- श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा, भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबीना

रविवारदि.6 ऑक्टोबर-दुर्गाष्टमी श्रीदेवीजींची नित्योपचार महापूजा, महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

सकाळी 6.00 वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ, सकाळी 11 वाजता पूर्णाहुती व रात्री छबिना

सोमवार, दि.7ऑक्टोबर- महानवमी, श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा, दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक

मंगळवार, दि.8ऑक्टोबर- विजयादशमी दसरा उष:काली, श्रीदेवीजींची शिबिकारोहन, सीमोल्लंघन, मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपूजन व सार्वत्रिक सीमोल्लंघन

रविवार, दि.13 ऑक्टोबर- पहाटे (म्हणजे 12 ऑक्टोबर 2019 च्या रात्री) श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, कोजागिरी व मंदिर पौर्णिमा व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबिना व जोगवा

सोमवार, दि.14 ऑक्टोबर– श्री देवीजींची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबिना.

तरी अधिकाधिक भाविकांनी या श्री तुळजा भवानी शारदीय नवरात्र महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे.