‘ईडी’च्या चौकशी वेळीच नाही तर ‘मी’ 7 जन्म त्यांच्या सोबत : शर्मिला ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी राज ठाकरे यांची पत्नी आहे, त्यामुळे ईडीच्या चौकशी वेळीच नाही तर सात जन्म मी त्यांच्या सोबत असेल, अशी भावनिक प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी वेळेआधीच ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासह त्यांचे कुटूंबिय देखील ईडी कार्यालयाजवळ पोहचले. जवळच असलेल्या ग्रॅंड हॉटेलमध्ये त्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासह मनसेचे वरिष्ठ नेते देखील हॉटेलमध्ये थांबले आहेत.

कृष्णकुंजवरुन सकाळी राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर त्यांंच्या गाड्या ईडीच्या कार्यालयाबाहेर काही अंतरावर थांबवण्यात आल्या आणि राज ठाकरे एकटे ईडीच्या कार्यालयाच्या दिक्षेने गेले.

या आधी राज यांचे कोहिनूरमधील भागीदार उन्मेष जोशी यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी जवळपास 8 तास सुरु होती. राज ठाकरे देखील आता या चौकशीला सामोरे जात आहे. या दरम्यान शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

You might also like