‘त्यांना’ उमेदवारी कशी देता येईल ?, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा सवाल

पाथर्डी (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. प्रताप ढाकणे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी परळी येथे गेलेल्या समर्थक कार्यकर्त्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पक्षात नसलेल्यांना उमेदवारी कशी देता येईल? गोपीनाथ मुंडे असतांना ते राष्ट्रवादीत गेले होते. असे सांगत ढाकणे यांच्या उमेदवारीवर नकारात्मकता दाखवत विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाच शेवगाव-पाथर्डी मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे ॲडव्होकेट ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

काल सकाळी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातून सुमारे दोनशे कार्यकर्ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. या कार्यकर्त्यांची ना. पंकजा मुंडे यांच्याशी सायंकाळी पंधरा मिनिटांची भेट झाली. या भेटीत कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट ढाकणे यांना भाजपाच्या उमेदवारीची मागणी केली. मंत्री मुंडे यांनी यावर बोलताना सांगितले की, ‘तुम्ही ज्यांना उमेदवारी मागता ते माझ्या पक्षात नाहीत. ते राष्ट्रवादीत आहेत. जगात असं कधी झालं नसेल आपण पक्षात नसताना उमेदवारीची मागणी केली. तुम्ही ज्याच्यासाठी उमेदवारी मागता त्यांनी कधी उमेदवारी मागितली नाही .’

विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी देऊ नये, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. यावर मंत्री मुंडे यांनी विद्यमान आमदारावर 25% कार्यकर्ते नाराज होतात. असे जर आपले म्हणणे असेल तर मला विचार करायला वेळ द्या. जनता दोन्ही बाजूने बोलते नेत्याला मात्र विचार करून बोलावे लागते. त्यामुळे ढाकणे यांच्या उमेदवारीबाबत कोणताही अंदाज बांधू नका, असे सूचवले. मंत्री मुंडे यांच्या भेटीनंतर ढाकणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर विरजण पडले आहे.

 

Loading...
You might also like