home page top 1

लाड सोनार महा अधिवेशन नियोजन संदर्भात औरंगाबाद येथे महत्त्वपूर्ण सोमवारी बैठक

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन -(धर्मा मैड) महाराष्ट्र राज्यातील लाड सोनार समाजाच्या वतीने भव्य महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे या नियोजनाची प्रथम बैठक ऐतिहासिक अ.नगर येथे हजारो समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाल्यानंतर दुसरी बैठक दि.२०मे२०१९ सोमवार रोजी सकाळी १०.३० वा. प्रसन्ना बिल्डकॉन (प्लॅन ८ ) , कॅम्ब्रिज स्कुलजवळ ,सुंदरवाडी जालनारोड औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील समाज बांधवांना औरंगाबाद हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. लाडसोनार महाअधिवेशन बाबत स्वागत अध्यक्ष तसेच विविध समितींचे निवड यावेळी करण्यात येणार असून महाअधिवेशन चे स्थळ आणि तारीख यावेळी ठरविण्यात येणार आहे.

बैठकीसाठी मुक्कामी येणाऱ्या समाज बांधवांसाठीची व्यवस्था औरंगाबाद येथील लाड सोनार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.नियोजन मीटिंग यशस्वी करण्यासाठी समाजातील विविध मान्यवर बंधु भगिनी प्रयत्न करीत आहे या बैठकीला महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर लाड सोनार समाज बांधव महिला भगिनी उपस्थित रहावे असे आवाहन औरंगाबाद लाड सोनार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading...
You might also like